औरंगाबाद: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गुजरातसह इतर राज्यातून औरंगाबाद जिल्ह्यात बोगस खतांचा पुरवठा झाल्याचे निदर्शनास येत आहे, शेतकर्यांनी आपली फसगत टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी केले आहे.
विविध कृषी सेवा केंद्रांमध्ये 10-26-26, 15-15,15 तसेच डीएपी अशी मान्यताप्राप्त खतांना स्वस्त दारातील पर्याय म्हणून उपलब्ध करण्यात आले आहे. काही कृषी सेवा केंद्रात याच नावाने सर्रास विक्री होत आहे. यामध्ये सदर कृषी सेवा केंद्र चालक, मालक शेतकर्याच्या आशिक्षित व अजानतेपणाचा लाभ घेत आहे. यामुळे हे शेतकरी खरेदी करताना तर ंगडवले जातच आहे. शिवाय या खतांच्या आधारे जे पीक घेणार आहेत त्यांच्या उत्पादन क्षमतेवरही परिणाम होणार आहे हे टाळण्यासाठी प्रत्येक शेतकर्याने खत खरेदी करताना त्या खतात असलेल्या अन्नद्रव्य म्हणून नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅश हे तीन घटक प्रमाणित मात्रामध्ये आहे किंवा नाही, त्याची नोंद सदर खताच्या बॅगवर नोंदवलेली आहे की नाही याची खात्री करावी व काही शंका आल्यास कृषी तालुका अधिकारी वा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.